असंख्य उद्योगांमध्ये एक्सेल हे एक महत्त्वाचे, मागणी असलेले Skill आहे. ह्या स्पर्धेच्या युगात सॉफ्ट स्किल्स येणे महत्वाचे मानले जाते. त्यापैकी एक आहे Advance Excel.
Excel हे प्रत्येक industry मध्ये वापरले जाते, डेटाचे स्टोरिंग मुख्यत्वे Excel च्या आधारे केले जाते.
तुम्ही आज कोणत्याही ठिकाणी जा, तुम्हाला जर Microsoft Excel येत असेल तर तुम्ही कधीही बेरोजगार राहू शकत नाही.
आज बेसिक लेवला, Excel माहिती स्टोर करण्यासाठी, रिपोर्टिंग साठी आणि सॉर्टींगसाठी वापरले जाते, तसेच खालील ठिकाणी सुद्धा वापरतात!
त्यामुळे आत्ताच्या काळात Excel आणि Advance Excel येणे फार गरजेचे आहे..
Advance excel हे जॉब मिळवताना आणि कोणतेही काम करण्यासाठी महत्वाचे मानले जाते. Advance excel ट्रेनिंग हे तुम्हाला कामामधील खूप महत्वाच्या भूमिका निभावण्यात मोलाचे ठरते.
Advance Excel Skill अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून देते आणि करिअरसाठी दरवाजे उघडते , विशेषत: ज्यांच्याकडे कोणतीही कॉलेज डिग्री नाही त्यांच्या साठी advance excel स्किल असणे वरदान आहे.
आत्ताच झालेल्या सर्व्हे नुसार ज्यांच्याकडे Advance Excel बद्दल स्किल्स आहेत त्यांना नोकरीमध्ये विशेषतः प्राधान्य दिले जाते